२६/११ च्या निमित्ताने
आज २६/११ ------ सर्व शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली .....
5 वर्षापूर्वी झालेल्या भीषण आतंकवादी हल्याची आठवण आज होणे स्वाभाविक आहे. दरम्यान गेल्या वर्षी क्रूरकर्मा कसाबला फासावर देण्यात आले पण त्यामुळे शहीद झालेल्यांना न्याय मिळाला का ? २६/११ च्या हल्ल्यातून आम्ही काहीच शिकलो नाही. आता दहशतवादी हल्यांची सवय व्हायला लागली. दहशतवादी हल्ला बरा पण त्यावरील प्रतिक्रिया नको अशी परिस्थिती निर्माण झाली ..... हल्ला झाल्याबरोबर '' नागरिकांनी शांतता राखावी, परस्पर सौहार्द राखावे, अफवांवर विश्वास ठेऊ नका, दहशतवादाला कोणता धर्म नसतो अशा साधारण प्रतिक्रिया असतात ..... त्या पहिल्या नंतर 'ते ' अतिरेकी परवडले पण ' हे ' नको . असे वाटते.
तरुण पिढीसुद्धा विजीगिषुपणे सरकारने लढावे असा दबाव आणण्यापेक्षा मेणबत्त्या पेटवण्यात धन्यता मनात आहे. महाराष्ट्राला आतंकवाद्यांशी कसे लढावे हे शिकण्यासाठी केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासच पुरेसा आहे मात्र त्यांनाही काहीजण जातीत बंदिस्त करू पाहत आहेत. काही स्वयंघोषित विचारवंत तर महाराजांना धर्मनिरपेक्ष ठरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी अफजलखान वधाच्या पोस्टरला एका धर्माशी जोडले जात आहे.
दहशतवादाला उत्तर द्यायचे असेल तर सर्व भारतीयांना जात, पंथ, प्रांत भेद विसरून एकत्र यावे लागेल विजीगिषु असे हिंदू संघटन निर्माण करावे लागेल. ( या देशात राहणारे सर्व हिंदूच आहेत.) राजकारणाच्या पलीकडे, जातीयवादाच्या पलीकडे विचार करावा लागेल. छत्रपती शिवराय, धर्मवीर शंभूराजे यांचा आदर्श युवा पिढीसमोर ठेऊन त्यांच्या पराक्रमाच्या गाथा सांगाव्या लागतील. हिंदू हा धर्मवाचक शब्द नसून संस्कृतीचा निदर्शक आहे. ज्या संस्कृतीतच समता, स्वातंत्र्य, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, अहिंसा हि सर्व तत्व ' हिंदू ' या एकाच व्याख्येत येतात त्यामुळे हिंदूत्व विचार अधिक बळकट करावा लागेल. जगात शांतता नांदायची असेल तर हिंदुत्व विचारच ती निर्माण करू शकतात हा इतिहास आहे. तो इतिहास जागवावा लागेल. दहशतवादाला कोणता धर्म नसतो हे खरे असले तरी हिंदू कधीही दहशतवादी होऊ शकत नाही हेही तितकेच खरे व त्रिवार सत्य आहे व तोच हिंदूंचा इतिहास आहे त्यामुळे अंतिम विजय सत्याचाच होणार यात शंका नाही.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा