मंगळवार, २६ नोव्हेंबर, २०१३

२६/११ च्या निमित्ताने 

           आज २६/११  ------  सर्व शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली ..... 
5 वर्षापूर्वी झालेल्या भीषण आतंकवादी हल्याची आठवण आज होणे स्वाभाविक आहे. दरम्यान गेल्या वर्षी क्रूरकर्मा कसाबला फासावर देण्यात आले पण त्यामुळे शहीद झालेल्यांना न्याय मिळाला का ? २६/११ च्या हल्ल्यातून आम्ही काहीच शिकलो नाही. आता दहशतवादी हल्यांची सवय व्हायला लागली. दहशतवादी हल्ला बरा पण त्यावरील प्रतिक्रिया नको अशी परिस्थिती निर्माण झाली ..... हल्ला झाल्याबरोबर '' नागरिकांनी शांतता राखावी, परस्पर सौहार्द राखावे, अफवांवर विश्वास ठेऊ नका, दहशतवादाला कोणता धर्म नसतो अशा साधारण प्रतिक्रिया असतात ..... त्या पहिल्या नंतर 'ते ' अतिरेकी परवडले पण ' हे ' नको . असे वाटते.  
          तरुण पिढीसुद्धा विजीगिषुपणे सरकारने लढावे असा दबाव आणण्यापेक्षा मेणबत्त्या पेटवण्यात धन्यता मनात आहे. महाराष्ट्राला आतंकवाद्यांशी कसे लढावे हे शिकण्यासाठी केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासच पुरेसा आहे मात्र त्यांनाही काहीजण जातीत बंदिस्त करू पाहत आहेत. काही स्वयंघोषित विचारवंत तर महाराजांना धर्मनिरपेक्ष ठरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी अफजलखान वधाच्या पोस्टरला एका धर्माशी जोडले जात आहे. 
             दहशतवादाला उत्तर द्यायचे असेल तर सर्व भारतीयांना जात, पंथ, प्रांत भेद विसरून एकत्र यावे लागेल विजीगिषु असे हिंदू संघटन निर्माण करावे लागेल. ( या देशात राहणारे सर्व हिंदूच आहेत.) राजकारणाच्या पलीकडे, जातीयवादाच्या पलीकडे विचार करावा लागेल. छत्रपती शिवराय, धर्मवीर शंभूराजे यांचा आदर्श युवा पिढीसमोर ठेऊन त्यांच्या पराक्रमाच्या गाथा सांगाव्या लागतील. हिंदू हा धर्मवाचक शब्द नसून संस्कृतीचा निदर्शक आहे. ज्या संस्कृतीतच समता, स्वातंत्र्य, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, अहिंसा हि सर्व तत्व ' हिंदू ' या एकाच व्याख्येत येतात त्यामुळे हिंदूत्व विचार अधिक बळकट करावा लागेल. जगात शांतता नांदायची असेल तर हिंदुत्व विचारच ती निर्माण करू शकतात हा इतिहास आहे. तो इतिहास जागवावा लागेल. दहशतवादाला कोणता धर्म नसतो हे खरे असले तरी हिंदू कधीही दहशतवादी होऊ शकत नाही हेही तितकेच खरे व त्रिवार सत्य आहे व तोच हिंदूंचा इतिहास आहे त्यामुळे अंतिम विजय सत्याचाच होणार यात शंका नाही. 




             

मंगळवार, १२ नोव्हेंबर, २०१३

तुम्हाला माहित आहे का सावरकर कोण होते ?

तुम्हाला माहित आहे का सावरकर कोण होते ? 
अलीकडे एका कुठल्यातरी भुक्कड संघटनेने स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ' सहा सोनेरी पाने ' पुस्तक जाळून त्यावर बंदी घालण्याची मागणी केली. का तर म्हणे त्या पुस्तकात शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. मध्यंतरी याच नावाच्या एका संघटनेच्या कार्यकर्त्याने ओवेसिच्या MIM ची मदत घेण्याची जाहीर गरळही ओकली होती असो. प्रश्न सावरकरांच्या लिखाणाचा त्या संदर्भात काही गोष्टी मनात आल्या सावरकर व त्यांचे कुटुंब देशभक्त होते पण त्याची जाहिरात त्यांनी नेहरू घराण्यासारखी केली नाही, सावरकरांचे साहित्य नेहमीच राष्ट्राच्या विरोधकांच्या मनात भीती निर्माण करणारे होते म्हणूनच " 1857 चे स्वातंत्र्य समर " या पुस्तकावर इंग्रजांनी बंदी आणली होती, सावरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलही अनेक गीते लिहिली आहेत शिवाजी महाराजांची आरतीही सावरकरांनी लिहिली आहे असे सावरकर शिवाजी महाराजांचा अपमान करतील का ? असा साधा प्रश्नही या मूर्खांना पडला नसेल का ? सावरकर व त्यांच्या कुटुंबाला जितक्या यातना व हाल अपेष्टा सोसल्या त्या खचितच कुणी सोसल्या असतील अशा स्वातंत्र्यवीराला मृत्यूनंतरही हाल अपेष्टा सोसाव्या लागत आहेत. सावरकर नुसते क्रांतिकारक नव्हते ते समाजसुधारकही होते हिंदू धर्मातील कालबाह्य व चुकीच्या प्रथांवर त्यांनी प्रहार केला. प्रसंगी सनातन्यानाही त्यांनी जुमानले नाही रत्नागिरीत त्यांनी मंदिरात प्रवेश नाकारलेल्यांसाठी पतित पावन मंदिराची स्थापना केली. मराठी भाषेत कविता, नाटके इ विपुल लिखाण केले. विविध शब्दांना मराठी नावे प्रचलित केली उदा. परिचारिका, लोकसभा, महापौर, प्राचार्य, प्राध्यापक, विधिमंडळ, टपाल इ. त्यांनी सर्व आयुष्य राष्ट्रासाठी समर्पित केले. आज सावरकरांवर अनर्गल टीका करणाऱ्यांच्या अकलेची कीव करावी वाटते. केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी, प्रसिद्धीसाठी सावरकरांसारख्या स्वातंत्र्य सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करणारांना उत्तर शब्दाने देत येत नाही. मात्र सावरकरांचे राष्ट्र उभारणीचे स्वप्न पूर्ण होण्यानेच सर्व विरोधकांना चोख उत्तर मिळेल. 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे काही प्रसिद्ध साहित्य .... 

१. छत्रपती शिवाजी महाराजांची आरती 
जयदेव जयदेव जय जय शिवराया !
या या अनन्य शरणा आर्यां ताराया !!धृ!!
आर्यांच्या देशावरि म्लेंच्छांचा घाला
आला आला सावध हो भूपाला
सद् गदिता भूमाता दे तुज हाकेला
करुणारव भेदुनि तव ऱ्हिदय न कां गेला?.....१
श्री जगदंबा जीस्तव शुंभादिक भक्षी
दशमुख मर्दुनी जी श्रीरघुवर संरक्षी
ती पूता भूमाता म्लेंच्छाही छळता
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता?.......२
त्रस्त अम्हि दीन अम्हि शरण तुला आलो
परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो
साधु परित्राणाया दुष्कृती नाशाया
भगवन् भगवतगीता सार्थ कराया या..........३
ऐकुनिया आर्यांचा धावा गहिवरला
करुणोक्ते स्वर्गी श्री शिवनृप गहिवरला
देशास्तव शिवनेरी घेई देहाला
देशास्तव रायगडी ठेवी देहाला
देशस्वातंत्र्याचा दाता जो झाला
बोला तत् श्रीमत्शिवनृप् की जय बोला..........४
बोला शिवाजी महाराज की ... जय !! 

२. हे हिन्दु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा...

हे हिन्दुशक्तिसंभुतदिप्तितमतेजा
हे हिन्दुशक्तिसंभुतदिप्तितमतेजा
हे हिन्दुतपस्यापुतईश्वरिओजा
हे हिन्दुश्री सौभाग्यभुतिच्यासाज्या
हे हिन्दु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा
करि हिन्दुराष्ट्र हे तु ते । वंदना
करि अंतःकरणज तुज । अभिनंदना
तव चरणी भक्तिच्याचर्चि । चंदना
गुढाशा पुरवी त्या न कथु शकतो जा
हे हिन्दु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा
हा भग्न तट असे गडागडाचा आजी
हा मग्न आज जयदुर्ग आसवांमाजी
ही भवानिची ह्या पुन्हा गंजली धारा
ती म्हणुनि भवानी दे न कुणा आधारा
गड कोट जंजिरे सारे । भंगले
जाहली राजधान्यांची । जंगले
परदास्य-पराभिव सारी । मंगले
या जगित जगू हि आज गमतसे लज्जा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
जि शुध्दि ह्रदाचि रामदास शिर डुलवी
जि बुध्दि पाचशाह्यास शत्रुच्या झुलवी
जि युक्ति कुटनितिक खलासि बुडवी
जि शक्ति बलोन्मत्तास पदतलि तुडवी
ति शुध्दि हेतुचि कर्मि । राहुदे
ति बुद्धि भाबड्या जिवा । लाहुदे
ति शक्ति शोणिता माजि । वाहुदे
दे पुन्हा मंत्र तो दिले समर्थे तु ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

३. स्वातंत्र्य देवीचे स्तोत्र 
जयोऽस्तु ते! जयोऽस्तु ते!
श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती त्वामहम् यशोयुतां वंदे!
राष्ट्राचें चैतन्य मूर्त तूं नीती संपदांची
स्वतन्त्रते भगवती श्रीमती राज्ञी तूं त्यांची
परवशतेच्या नभांत तूंचि आकाशीं होशी
स्वतन्त्रते भगवती चांदणी चमचम-लखलखशी
गालावरच्या कुसुमीं किंवा कुसुमांच्या गालीं
स्वतन्त्रते भगवती तूंच जी विलसतसे लाली
तुं सूर्याचें तेज उदधिचें गांभीर्यहिं तूंचि
स्वतन्त्रते भगवती अन्यथा ग्रहणनष्टतेची
मोक्ष-मुक्ति हीं तुझींच रूपें तुलाच वेदांतीं
स्वतन्त्रते भगवती योगिजन परब्रह्म वदती
जें जें उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर तें तें
स्वतन्त्रते भगवती सर्व तव सहकारी होती
हे अधमरक्तरञ्जिते सुजनपूजिते श्री स्वतन्त्रते
तुजसाठि मरण तें जनन
तुजवीण जनन तें मरण
तुज सकल-चराचर-शरण चराचर-शरण

४. माझं मृत्युपत्र

हे मातृभूमी तुजला मन वाहियेले, वक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले, - १
तुतेंची अर्पिली नवी कविता रसाला, लेखप्रती विषय तुंचि अनन्य झाला . - २
त्वत्स्थंडिली ढकलिले प्रिय मित्रसंघा, केले स्वयें दहन यौवन-देह्-भोगा - ३
त्वर्य नैतिक सुसंगत सर्व देवा, तत्सेवनीच गमली रघुवीर सेवा. - ४
त्वत्स्थंडिलीं ढकलिलीं गृहवित्तमत्ता, दावानलांत वहिनी नवपुत्रकांता - ५
त्वत्स्थंडिली अतुल्-धैर्य वरिष्ठ बंधू, केला हवी परमकारुण पुण्यसिंधू - ६
त्वत्स्थंडिलावरी बळी प्रिय 'बाळ' झाला, त्वत्स्थंडिली बघ आता मम देह ठेला - ७
हें काय! असतो बंधु जरी सात आम्ही, त्वत्स्थंडिलींच असते दिधलें बळी मी - ८
संतान ह्या भरतभूमिस तीस कोटी, जे मातृभक्ति-रत सज्जन धन्य होती. - ९

हे आपुले कुलही त्यामधि इश्वरांश, निर्वंश होउनी ठरेल अखंड-वंश - १०
की ते ठरोंही अथवा नठरो परंतू , हे मातृभू अम्ही असो परिपुर्ण-हेतू - ११
दिप्तानलात निज मातृविमोचनार्थ, हा स्वार्थ जाळुनि अम्ही ठरलो कृतार्थ - १२
ऐसें विसंचुनी अहो वहिनी! व्रतांते, पाळोनि वर्धन करा कुल-दिव्यतेते - १३
श्रीपार्वती तप लरी हिमपर्वतीं ती, की विस्तवात हसल्या बहु राजपूती - १४
तें भारतीय अबला-बलतेज कांही, अद्यापि ह्या भरतभूमींत लुप्त नाही - १५
हें सिद्ध होइल असेंच उदार उग्र, वीरांगने तव सुवर्तन हो समग्र - १६
माझा निरोप तुज येथुनी हाच देवी, हा वत्स वत्सल तुझ्या पदिं शीर्ष ठेंवी - १७
सप्रेम अर्पण असो प्रणतीं तुम्हांते, आलिगन प्रियकरां मम अंगनेतें. - १८
की घेतले व्रत न हें अम्हि अंधतेने, लब्ध-प्रकाश इतीहास्-निसर्ग-मानें, - १९
जें दिव्य दाहक म्हणूनि असावयाचे, बुद्ध्याचि वाण धरिंले करिं हे सतीचे. - २०